रविवार, जून 08, 2008

यूं तो गुजर रहा है हर इक पल खुशी के साथ

यूं तो गुजर रहा है हर इक पल खुशी के साथ
फिर भी कोई कमीं सी है, क्यूं जिंदगी के साथ...

खरं तर खूप छान चाललंय तरी देखील कशाचा तरी अभाव जाणवतो. असं अपूर्ण असणं हा जीवनाचा स्थायीभाव आहे हे माहित असून ही अशी तक्रार असते. मला खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी मी मेहनत ही करतो आहे पण या सगळ्या उद्योगात माझ्या आवडीच्या गोष्टी फार मागे पडताहेत.

माझं पुस्तकांवर फार प्रेम आहे या प्रेमापोटीच मी आमच्या ऑफिस मध्ये मराठी वाङमय मंडळाच्या स्थापनेत हातभार लावला, प्रसंगी भांडलोय देखील पण आज त्या दोनशे पुस्तकांपैकी 20 पुस्तकंही मी वाचली नसतील. वाचनालयाच्या वेळेत शक्यतो मी दुसरं काम ठेवत नाही. पुस्तकं देण्यासाठी मी तिथे असतो पण मी किती पुस्तकं वाचली हा एक प्रश्न आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला सोडाव्या लागल्या... कधी स्वतःसाठी.. कधी घरच्यांसाठी.. आणि कधी लोकांसाठी.

माझ्या मैत्रीणीने माझी तळमळ जाणून एक दोन कविता ही लिहून टाकल्या. http://ratnahile.blogspot.com/2008/05/blog-post.html

हे कवि लोक ना...
कशावरही कविता करतात.

1 टिप्पणी:

Khushal ने कहा…

Dear Prasad,

My blog is yours inspiration only,

I really like contents of your blog, you are writing jo dil ne kaha & that too totally with "Dil se".

Your thoughts are really amazing & your self confession is very daring.

I appreciate you for everthing you are doing with constructive approach.

And thanks for inspiration & your comments on my blog, I want to know how you have used gujarati fonts?

With love & regards,

Khushal
09/06/08