मंगलवार, जुलाई 01, 2008

चिन्मयी इन्फोटेक ची साईट तयार झाली.

बऱ्याच दिवसांपासून तयारी करतोय. शेवटी आज चिन्मयी इन्फोटेक ची साईट तयार झाली. अजून बरीच माहिती टाकायची आहे. सर्व सॉफ्टवेयर्स ची माहिती अजून टाकली नाही.

www.chinmayeeinfotech.com

रात्रीचे 2.30 होत आले आहेत. उद्या लेकीला तयार करुन 7 वाजता शाळेत पाठवायची आहे. माझं काही खरं नाही.

पण साईट मात्र मस्त झाली. लवकरच फोरम आणि चॅट ची सोय केली की झालं.

आज टीव्ही च्या कुठच्यातरी कार्यक्रमात सहज कानावर शेर पडला

लोगों को आदत है वो खडी करते है दिवारें
मैंने दिवारों पर छत रख दी ।

काय झकास अर्थ आहे. एकदम माझी फिलॉसॉफी. भिंती नी दुभंगून दूर झालेल्या लोकांना एक घर मिळवून देणं. लोकांना जोडणं फार महत्वाचं. मला आवडतात माणसं.

शायर चं नाव लक्षात ठेवलं आहे.( वसीम) कधीतरी वाचलं पाहीजे त्यांचं साहित्य.

1 टिप्पणी:

Khushal ने कहा…

Dear Prasad,

Your website is great as far as colour schemes, styling, I liked the fonts increasing / decreasing option, it it unique.

I also like the contact us page where you give option to mark email copy to the visitors email,

I loved it,

I have certain suggestions & will call you & tell you as early as possible, it is very serious & interesting,

With love,

Khushal,
02/07/2008