आजच मी "बाकी शून्य" हे कमलेश वालावलकर यांच पुस्तक वाचलं.
बऱ्याच दिवसांपासून मला हे पुस्तक वाचायचं होतं. माझ्या मैत्रिणीने मला हे सांगितलं कि बऱ्याचश्या घटना ह्या मी सांगितलेल्या सारख्या आहेत. एवढंच नाही पण त्या कादंबरीतल्या "जयराज सरदेसाई" या मुख्य पात्राचा स्वभाव, बोलण्याची लकब इत्यादी गोष्टींच माझ्याशी खुप साम्य आहे.
आता पुस्तक वाचून मी थोडा अचंभीत झालो. साम्य म्हणजे काहीतरीच साम्य ! विचाराची पद्धतच नाही तर चक्क विचारही सारखे. मला जास्त आश्चर्य वाटलं विचार करायच्या पद्धतीचं आणि बोलण्याच्या लकबीचं. माझ्या सारखीच शिवराळ भाषा, विचार प्रगट करायची पद्धत.
फक्त शेवटी ह्या कादंबरीने बोअर केलं. पण मी खुश आहे. काही संवाद तर झकास जमले आहेत.
बऱ्याच दिवसांनी असं इतकं खरं आयुष्य दर्शवलेलं पुस्तक वाचलं.
.
रविवार, जून 22, 2008
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें