सोमवार, जून 16, 2008

दोन मित्र - दोघांच्या दोन तऱ्हा

आज मला माझे दोन मित्र भेट देऊन गेले.
एकदम भयाण घनदाट (सर्वसामान्यांच्या भाषेत बोलायचं तर एकदम खास ) मित्र !


मित्र नं.एक

एकदम जिवलग मित्र. पण काही घटना अशा घडल्या की मी त्याच्यावर वैतागलो. मी बराच त्रागा केला आणि तो मला सोडून गेला. मी विचार करतच राहिलो.

आम्ही आज भेटलो ते पण एकदम फॉर्मल.

हम तो युं अपनी जिंदगी से मिले
अजनबी जैसे अजनबी से मिले ।।

हर वफा एक जुर्म हो गोय़ा
दोस्त कुछ ऐसी बेरुख़ी से मिले ।।


मित्र नं. दोन

माझ्या ओढीने येणारा. नेहमी कुठच्यातरी तिसऱ्याच माणसाचे प्रश्न घेऊन येणारा. त्याची मनापासून अपेक्षा की मी त्यांचे प्रश्न सोडवावेत. ह्याची विचाराची पद्धत एकदम वेगळीच. दरवेळी हा मला अचंभित करतो. कधीही कुठेही जाणारा. एवढी एनर्जी कुठून येते कुणास ठाऊक !

माझ्याशी बोलल्याने प्रॉब्लेम सुटतात असं त्याला वाटतं. नेहमी काहीतरी करत असतो. पण कितीही कामात असेल पण वेळात वेळ काढून बोलणार.

एवढं वाचल्यावर एखाद्याला वाटेल मित्र नं. दोन हा माझ्या जातकुळीचा मित्र असेल पण खरं तर आमचे आदर्श एकदम भिन्न आहेत. आमच्या विचारधारा भिन्न आहेत.
  • मी कट्टर हिंदू तर तो आंबेडकरवादी.
  • मी आस्तिक तर तो नास्तिक
  • तो हाय प्रोफाईल तर मी लो प्रोफाईल राहणारा
ही यादी बरीच लांब आहे.
पण आम्ही एकमेकांच्या भावना समजतो. उगाचच आम्ही एकमेकांना उपदेश करायला जात नाही. कितीही रागवलो तरी आम्ही येतो जवळ (शिव्याघालण्यासाठी का असेना).
मित्र असतातच कशासाठी ? एकमेकांशी अबोला धरण्यासाठी का एकमेंकाना आधार देण्यासाठी.

कोई टिप्पणी नहीं: