बुधवार, फ़रवरी 10, 2010

दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

"दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला" हे माझं अत्यंत आवडतं गाणं. संदिप खरे ह्यांच्या ह्या गाण्याचे शब्द मला पाहिजे होते, कुठेही नेटवर मराठी मध्ये मला ते सापडले नाहीत. मग मी ठरवलं आपणंच गाणं ऐकून लिहून काढूया. मला नक्की खात्री आहे मला तुमच्याकडून शाबासकी मिळणार -- प्रसाद साखरकर



कोमेजून निजलेली एक परी राणी,
उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी ||2||

रोजचेच आहे सारे काही आज नाही,
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुलां
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

ला.. ला ला ला ला, ला.. ला ला ला ला ||2||

आटपाट नगरात गर्दी होती भारी,
घामाघूम राजा करी लोकलची वारी ||2||

रोज सकाळीच राजा निघताना बोले,
गोष्ट सांगायाचे काल राहूनीया गेले,
जमलेचं नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतचं घरी
स्वप्नातल्या गावा मध्ये मारू मग फेरी
ख-या खु-या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला...

ला.. ला ला ला ला, ला.. ला ला ला ला ||2||

ऑफिसातं ऊशीरा मी असतो बसून ||2||
भंडावले डोके गेले कामात बुडून ||2||
तास तास जातो खाल मानेनं निघून ||2||
एक एक दिवा जातो हळूचं विझून ||2||
अशावेळी काय सांगू काय काय वाटे ||2||
आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे ||2||
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे ||2||
तुझ्यासाठी मी ही पू्न्हा लहानगे व्हावे
उगाचचं रूसावे नी भांडावे तुझ्याशी ||2||
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी


उधळतं खिदळतं बोलशील काही
बघताना भान मला उरणारं नाही ||2||

हसूनिया उगाचचं ओरडेल काही
दुरूनचं आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जणं दंगा मांडू असा
क्षणा क्षणा वर ठेऊ खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुलां
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

ला.. ला ला ला ला, ला.. ला ला ला ला ||2||

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई ||2||
मऊ मऊ दुध भात भरवेल आई ||2||

गोष्ट ऐकायाला मग येशील ना अशी ||2||
सावरीच्या उशी हून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेऊ खाऊ न्हाऊ माखु घालतो ना तुला
आई परी वेणी फणी करतो ना तुला ||2||
तुझ्या साठी आई परी बाबा सुद्धा खुळा
तो ही कधी गुपचुप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुलां
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला.. ला ला ला ला, ला.. ला ला ला ला,

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात ||2||
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात,
आई म्हणण्याआधी सु्द्धा म्हणली होतीस बाबा ||2||
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा ||2||
लुटू लुटू उभं राहात टाकलंस पाऊल पहिलं ||2||
दुरचं पहात राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पूरा अडकून
हल्ली तुला झोपेतचं पहातो दुरून ||2||

असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे तुझे निसटून
उरे काय तुझ्या माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं ||2||

सासूराला जाता जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये ?
ला.. ला ला ला ला, ला.. ला ला ला ला, ला..
ला ला ला ला, ला.. ला ला ला ला, ला.. ||2||

कोई टिप्पणी नहीं: