शनिवार, दिसंबर 06, 2008

मराठी टंकणाची सोय झाली

बऱ्याच दिवसांपासून मला मराठी वाङ्‍मय मंडळाच्या साईट वर फोनेटिक टंकण सूविधा टाकायची होती. आता ते शक्य झालं. कालची रात्र जागवावी लागली पण मजा आली. सगळ्यांनाच इंस्क्रिप्ट चा की बोर्ड येत नाही त्यामूळे ही सोय करणं भाग होतं.

खरं तर इंस्क्रिप्ट चा की बोर्ड सर्वांना शिकवण्याची सोय केली पाहिजे. मी हिंदी विभाग च्या मार्फत देवनागरी शिकवायची सुरवात केलेली. मला काही चांगले स्टूडंट मिळाले ही होते. काही तर ग्रेट होते. कृपा, कविता ह्यांनी तर खुप वेगाने प्रगती केलेली. पण मला हे अर्धवट सोडावं लागलं. कारण विभागाकडून कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक मिळणार नव्हतं शिवाय मलाच तु कुठे होतास, काय करत होतास असे प्रश्न विचारायला लागले. माझं तर डोकं फिरलेलं. त्यात मॅडम पण क्लास चालू असताना सारखी फोन करत रहायची.

मी ठरवलं नियमानुसार जो पर्यंत कंपनी तर्फे नीट ट्रेनिंग दिलं जात नाही तोपर्यंत क्लास बंद. मी आताही ते क्लास सुरू करण्याच्या मार्गावर आहे. प्रधान कार्यालयाकडून संमति मिळाली की झालं.

कोई टिप्पणी नहीं: